अजित पवार म्हणाले, महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं. काही राजकीय स्थितंर घडली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यानंतर सरकामध्ये गेले. एकनाथराव आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले. त्याच वेळी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरविले होते. माझी सही होती, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आणि छगन भुजबळ आणि नितीन पवारांसह अनेकांच्या सह्या होत्या. पण त्यावेळी अशी काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही .
advertisement
तुम्ही सत्तेत होता तेव्हा सव्वा रुपया दक्षणा दिली नाही, अजित पवारांचा टोला
लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेवर अनेकांनी टीका केली आरोप केले. महाराष्ट्र दिवाळखोरी त काढतो असे आरोप केले. पण मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे. नियमात असेल तरच एकतो. गरिबाला दिले, जातपात बघत नाही गरीब बहीण आहे तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. आम्ही इतके दिवस सत्तेत होते,आमच्याही लक्षत आले नाही, हे दुर्दैव आहे. तुम्ही सत्तेत होता सव्वा रुपया दक्षणा ही दिली नाही. थेट खात्यावर पैसे देतो,मध्यस्थी कोणीच नाही. आचारसंहिता येणार म्हणून ऑक्टोबर ला पैसे दिले. काळजी करू का पाच वर्षे योजना राबवायची आहे.
1 ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला 7 रुपये अनुदान : अजित पवार
अजित पवार म्हणाले, लाईट बिल माफ केले, साडेनऊ हजार सोलरवर वीज माफ करतोय दिवसा वीज मिळणार आहे. रात्री शेतात जाण्याची गरज नाही, बिबट रानडुक्कर गवे येतता घरचे काळजीत असतात. 1 ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला 7 रुपये अनुदान दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे देतोय, पारदर्शकता आहे. मध्ये कुठेच गळती नाही. अजितदादाचा वादा आहे. पुढील 5 वर्ष विजबिल माफ तुम्ही फक्त आशीर्वाद द्या.जेवढे उमेदवार उभे केले, तिथे जातोय.
केंद्र सरकार पाठिशी, सर्व योजना पूर्ण करू :अजित पवार
मागासवर्गीयांना साडेबारा टक्के जागा दिल्या. मुस्लिम समाजाला 10 टक्के जागा दिल्या. आम्ही सर्वाना बरोबर घेऊन जातोय,भेदभाव करत नाही. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा ने जातोय. राज्य,महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार हा जाहिरनामा देतोय. केंद्र सरकार पाठिशी आहे, त्यामुळे तुमच्या सर्व योजना पूर्ण करू कामे आणू, असेही अजित पवार म्हणाले.
