माहितीनुसार, अंजली कृष्णा या अधिकाऱ्यांनी उत्खनन रोखण्यासाठी कारवाई सुरू केली असताना त्यांना फोन कॉलवरून अजित पवार यांनी कारवाई थांबण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप पवारांवर झाला आहे. दरम्यान, प्रकरण तापल्यावर अजित पवार यांनी आपली बाजू मांडली. 'माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
advertisement
बाबा जगतापचा नवा व्हिडीओ समोर
या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा यांनी उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालून पवारांशी थेट संपर्क साधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये भर म्हणजे, बाबा जगताप याचा धुम्रपान करणारा नवा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता
अवैध उत्खननासंदर्भात वारंवार राजकीय दबाव येत असल्याच्या चर्चा याआधीही होत होत्या. मात्र, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेले संभाषण आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा व्हिडीओ हे दोन्ही प्रकार एकत्र आल्याने या प्रकरणावरून मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.