आज सकाळी अजित पवार यांनी बारामतीतील गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. महापालिका निवडणूक निकालानंतर अजित पवार तडकाफडकी काकांना भेटायला का गेले? यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या बैठकीबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार आहे. महानगर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
या भेटीनंतर आता अजित पवार देखील पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी बारा वाजता अजित पवार आपली भूमिका मांडणार आहेत. महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी बराच वेळ गेला. त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही, याचा फटका कुठेतरी निवडणुकीत बसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी सावध भूमिका घेत. लगेच कामाला लागले आहेत.
