छत्रपती कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने शुभारंभाच्या सभेत अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकले. नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढच्या पाच वर्षांतल्या कारखान्याच्या प्रगतीचा आलेखच त्यांनी मांडला.
माझी सुरुवात कारखान्याच्या निवडणुकीपासून झाली
आम्हाला भरणेवाडीने एकेकाळी वाचवलं. पेटी फुटली की 600 मते आम्हाला असायची. जे बारामतीकर लाखोंच्या मताने निवडून देतात. त्यावेळी अजित पवार हा फक्त 45 मतांनी कारखान्यात जिंकून आला. माझी राजकीय जीवनाची सुरुवात 1984 साली या कारखान्यातून झाली. इथे आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. मी निवडणुकीत भाग घेणार नव्हतो, पण याच कारखान्यातून माझी सुरुवात झाली. त्याआधी मला महाराष्ट्रमध्ये कुणी ओळखत नव्हते.
advertisement
हा अजित पवार ९६ कुळी मराठाच आहे ना....
आपलं पॅनेल चांगलं आहे. पण कोण म्हणेल डोरलेवाडीचा कोणीच उमेदवार दिला नाही, कोण म्हणेल मराठाच दिला नाही. अरे मग तुमच्या समोर कोण उभा आहे ? हा अजित पवार 96 कुळी मराठाच आहे ना ? की मग मी दुसरा कुणी आहे? उद्या जर या कारखान्याच्या पॅनलबाबत कोणी काही चुकीचे केलं ना तर माझ्या दारात पुन्हा कुणी यायचं नाही. मागे आमच्यात आणि जाचक यांच्यात अंतर पडलं. आम्हाला आता पूर्वीचे दिवस दाखवायचे आहेत. कारखान्याला चांगले दिवस आणायचे आहेत. उद्या संचालक मंडळ निवडून आल्यावर कोणी आगाऊ डोकं लावायचं नाही. आम्ही सांगेल तेच ऐकायचं. उद्या हा पॅनल निवडून दिल्यावर एका झटक्यात दर वाढवून मिळणार नाही पण हळूहळू वाढेल.
आपलं पॅनेल चांगलं आहे, पण जास्त डोकं लावायचं नाही...
माझा 4 हजार टन इथे ऊस जातो. मी नुकसान सहन करू शकतो पण लहान शेतकऱ्याचं काय? आज आपल्यात आणि माळेगावात 700 रुपये प्रति टन फरक आहे. मी त्या खोलात जाणार नाही. मी सरकारमध्ये असल्याने राष्ट्रवादीकडे सहकार, अर्थ, उत्पादन शुल्क खाते आले आहे. कामगारांनी सही केल्यावर तिथे कामच केले पाहिजे. पण सही करून चकाट्या मारत बसला तर मग मी माफ करणार नाही. दिलेले पॅनल ही कारखान्याची परिस्थिती बदलवू शकते, कारण त्यांच्या मागे या राज्याचा उपमुख्यमंत्री उभा आहे. आज एमएसपी ४ हजार होण्याची गरज आहे, तरच कारखाने टिकणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.