राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बुधवारी बीडला आले. गुरूवारी सकाळपासूनच त्यांनी बीडच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. तसेच विकासकामांची जागोजागी जाऊन पाहणी केली. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत बीडकरांनी खंबीरपणे आमच्यासोबत सहभागी व्हावे, अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली.
चुकीची वागणूक असेल तर सहन करणार नाही, लहान मोठा बघणार नाही
advertisement
अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्याची बदनामी थांबवावी लागेल. चुकेल तो कोणीही असू द्या मी मागेपुढे बघणार नाही. सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा, त्यांना शासन झालेच पाहिजे. कोणी छोटा मोठा नाही. कायदा सर्वांना समान आहे. चुकीची वागणूक असेल तर सहन करणार नाही, असे सांगत माझ्यासहित सर्वांनी शिस्त पाळावी, असे अजित पवार म्हणाले.
एकदा दोनदा सांगेन, सांगून ऐकत नसले तर मकोका लावेन मग चक्की पिसिंग पिसिंग
एकदा दोनदा सांगेन, सांगून ऐकत नसले तर मकोका लावेन मग चक्की पिसिंग पिसिंग... अशा खास शैलीत अजित पवार यांनी तरूणांना तंबी दिली. गुंडा गर्दी आणि चुकीचे काम करणाऱ्यांना अजित पवार यांनी थेट बीडमध्ये जाऊन इशारा दिल्याची कार्यक्रमस्थळी एकच चर्चा होती.
अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना योग वागणूक द्यावी
अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना योग वागणूक द्यावी. आगामी काळात बीड जिल्ह्याला चांगला निधी आणण्यासाठी आणि दर्जेदार विकासकामांसाठी माझा प्रयत्न असेल. विकसित बीडसाठी शहरवासियांची मला तेवढीच साथ गरजेची आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच ऊसतोड मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली.
