TRENDING:

महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या

Last Updated:

अकोला महानगरपालिकेत भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी विजयी, काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांत तुफान राडा, एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्याने गदारोळ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुंदन जाधव, प्रतिनिधी अकोला: अकोल्यामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवड झाली. त्यानंतर सभागृहात हा तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले. एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले, त्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर राड्यामध्ये झालं. काँग्रेसनं दादागिरी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. अकोला महानगरपालिकेचा पहिलाच दिवस राड्यानं गाजला. दरवेळी प्रमाणे याहीवेळी हा दिवस तुफान राड्याने गाजला आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.

advertisement

अकोला महापौर पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी. उबाठाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी केला पराभव. काळे यांना मिळाले 32 मते. तर एमआयएम च्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली असून भाजपचे अपक्ष बंडखोर नगर सेवक आशिष पवित्रकार यांनी अखेर घरवापसी करत भाजपला मतदान केले.

advertisement

अकोल्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता राखली आहे. शहर सुधार आघाडीकडून भाजपने आपली सत्ता आणली आहे. भाजपच्या शारदा खेडकर या महापौर पदी विराजमान झाल्याची माहिती आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली आहे. 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोल्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप हा 38 जागा जिंकून एक नंबरचा पक्ष ठरला मात्र बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळे भाजपने खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षासह अजित पवार यांचा एक, शिंदे सेना, महानगर विकास आघाडीसह एका अपक्षाला सोबत घेत एकूण 45 सदस्यांसह सत्तेचे गणित जुळवलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

निकालानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.. काँग्रेसकडून वंचित आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता.. मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात होत्या मात्र भाजपने राजकीय खेळी खेळत काँग्रेससह वंचितला शह दिला.. आणि महापालिकेत आपली सत्ता राखली आहे. तर एमआयएम च्या तीन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने ही निवडणुक 77 पैकी 45 विरुद्ध 32 असा सामना भाजपने जिंकला आहे..अकोला महापौर पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी झाल्या तर. उबाठाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी केला पराभव झाला. काळे यांना मिळाले 32 मते मिळाली. तर एमआयएम च्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल