नेमकं काय म्हणाले मिटकरी?
राजकीय पटलावर मोठा भूकंप होण्याची शक्यता शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी म्हटलं की देसाई यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. दिवाळीपूर्वी आमचं संख्याबळ चारने वाढलेलं दिसेल असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. आता मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले देसाई?
advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. आता नवरात्रोत्सवादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कालच पित्रपक्ष संपला, काही लोकांच्या मनात शंका असते त्यामुळे या काळात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र आता नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांची सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. कदाचित त्यापैकी काही जण महायुतीला पाठिंबा देणार असतील, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.