अक्षय नागलकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हॉटेलचे शटर बंद करून अक्षयच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकत त्याची हत्या करण्यात आली आहे. दोन देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांनी त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनी आरोपींकडून मृतकाच्या हाडांचे तुकडे, राख, २ देशी पिस्तुल, कोयता व ६ जिवंत काडतुसे, टाटा इंडिगो कार, तीन मोटारसायकली, सात मोबाइल फोन असे साहित्य ताब्यात घेतले आहेत. पोलिसांकडून राख आणि हाडांचे अवशेषसही ताब्यात घेतले आहेत. हाडांच्या तुकड्यांची डीएनए चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे, अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
15 मिनिटांत येतो, सांगून गेलेला अक्षयचा आलाच नाही
22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता 15 मिनिटांत येतो असे सांगून घरातून बाहेर पडला, पण ते परतलाच नाही. कुटुंबीयांनी 23 ऑक्टोबर रोजी डाबकीरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. काही नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तत्काळ विशेष पथके स्थापन केली.
चार दिवसांनी अक्षयचा खून झाल्याचं समोर
अकोला शहरात 22 ऑक्टोबरला अक्षय नागलकर हा युवक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी तो घरी न आल्याने पोलिसात तक्रार केली. अखेर चार दिवसांनी अक्षयचा खून झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. हे नऊ आरोपी नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चंदू बोरकर, आशु वानखडे, श्रीकृष्ण भाकरे, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, अमोल उन्हाळे, आकाश शिंदे, नारायण मेसरे, शिवा माळी या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
