अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी येथील ग्रामपंचायतीत सरपंच पद्मा मेसकर आणी विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाइल हाणामारी झाली. या हाणामारीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या घटनाक्रमानुसार, महिला सरपंच त्या सदस्याजवळ येतात आणि रागाच्या भरात जाब विचारतात. या दरम्यान सरपंच आणि सदस्यामध्ये शाब्दीक बाचाबाची होती.या बाचाबाचीनंतर अचानक महिला सरपंच सदस्याला कानशिलात मारण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान सदस्य देखील त्यांना रोखण्यासाठी समोर येतो. यावेळी तो महिला सरपंच आणि महिलेला देखील ढकलून देताना दिसला आहे.यानंतर इतर लोक भांडण मिटवतात पण त्यांच्यात शाब्दीक वाद हा सूरूच असतो.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार सरपंच यांना विश्वासात न घेता जागेचा नमुना आठ अ फेरफार केल्याप्रकरणी हा वाद झाला होता. या वादानंतर दोघांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत सुरुवातीला एक महिला एका पुरुषाच्या कानशिलात लगावते, नंतर तो पुरुष महिलेला मारहाण करतो, त्यानंतर पुन्हा महिला त्या पुरुषाला मारहाण करते हे दृश्य ग्रामपंचायत कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. या घटने संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधित तपास सूरू आहे.