बोहोत हो गई महागाई की मार, अबकी बार मोदी सरकारचं काय झालं? आयुष्यमान भारत कार्ड चालत नसल्याने केला तरुणीचा मृत्यू झाला. ज्यांना नकली शिवसेना म्हणता त्यांचे उंबरठे तुम्ही झिजवले. तर असली तुमच्या सोबत आहे त्यांना तुम्ही दहा जागा दिल्या नाही. त्यांचे उमेदवार ठरवत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करणारी शिवसेना तुमच्याविरूद्ध लढा देणार असल्याचा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला.
advertisement
अमित शहांवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, गुजरात आणि महाराष्ट्र जाऊन बघावं. महाराष्ट्राचा विकास पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पुढे आहे. याच खजिन्याच्या आधारावर राज्य चालत आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे खजिन्याच्या जीवावर काय करत आहेत हे महाराष्ट्र बघतो आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मविआकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या विरोधात असलेल्या शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत असं विधान केलं. त्याबाबत बोलताना अबादास दानवे यांनी म्हटलं की, शाहु महाराजांच्या विरोधातील उमेदवार संजय मंडलिक यांनी महाराजांच्या गादीचा अपमान केला आहे. हे महाराष्ट्राला सहन होणार नाही. याला भाजप आणि मिंधे जबाबदार आहे.