डबल नेमचा डाव टाकून मतदानावेळी उमदेवाराला पेचात टाकण्याचे काम करण्यात आला आहे. डबल नेमचा गेममुळेच देवदत्त निकमांचे गणित बिघडले हे आता स्पष्ट झाले आहे. दिलीप वळसेंचा एका डावाने देवदत्त निकमांचा विजय हिरावून घेतलाय. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं.
कसा विजय खेचून आणला?
advertisement
विशेष म्हणजे शरद पवारांच्या देवदत्त निकमांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह हे ट्रम्पेट होते. ट्रॅम्पेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा वळसेंनी करून घेण्याची खेळी केली, जी वळसेंना तारणारी ठरली. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या 1500 मतांनी झाला, तेव्हा अपक्ष देवदत्त शिवाजी निकमांना 2900 हुन अधिक मतं मिळाली.
देवदत्त निकमांना किती मते मिळाली?
शरद पवारांचे देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2900 मते शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांना मिळाली असती. त्यामुळं दिलीप वळसेंनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकमांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसेंचा पराभव झाला असता.
