अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली होती.. आशा तायडे-घुले (वय ३८) असं हत्या झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आशा तायडे या गुरुकृपा कॉलनीमध्ये आपल्या पतीसह राहत होत्या. आशा घुले यांचे पती देखील राज्य राखीव पोलीस दल अर्थात एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहे. हत्या झालेल्या आशा घुले या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरावती पोलीस दलातीलच महिला कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.
advertisement
आशा घुलेंचा पतीला अटक
या प्रकरणात अखेरीस कॉन्स्टेबल महिलेचा पतीच निघाला हत्येचा मास्टरमाइंड निघाला. राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडे नेच पोलीस पत्नीच्या हत्तेचा कट रचला होता. दोन मित्राच्या मदतीने पत्नीच्या गळा दाबून हत्या केली होती. आरोपी पतीने एक महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचला होता. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच राहुल तायडेनं खून कसा केला याची कबुली दिली.
लव्ह मॅरेज, २ मुलं पण प्रेम प्रकरणामुळे आशा घुलेंना संपवलं
आरोपी राहुल तायडे याचे एका महिलेशी प्रेम प्रकरणं होतं. त्यातून सतत घरी पत्नी आशा घुले यांच्याशी वाद होत होता. आरोपी राहुल तायडेचं 4- 5 वर्षापासून बाहेरील एका महिलेशी प्रेम प्रकरण होतं. याआधी देखील पत्नी आशा घुले यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. विशेष म्हणजे, राहुल तायडे आणि आशा यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांनाही बारा वर्षांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 13 वर्षांपूर्वी या दोघांचाही प्रेम विवाह झाला होता. पण राहुल बाहेर एका महिलेच्या प्रेमात पडला. बायको सारखी विरोध करत असल्यामुळे त्याने शांत डोक्याने तिचा काटा काढण्याचा कट रचला. शुक्रवारी घरात चोरी झाली यावेळी करून पत्नीची हत्या झाली, असा बनवा राहुलने रचला होता.
पोलिसांनी राहुल तायडेला अटक केली असून त्याला जिल्हा न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपी राहुल तायडे याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करच आहे.
