बेपत्ता मुलाचा शोध सुरू
मंगळवारी वैभव मोहोडला हळद लागणार होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून तो काही कामानिमित्त घराबाहेर पडला. परंतु घरी परतला नाही. दरम्यान मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांकडून या बेपत्ता मुलाचा शोध सुरू आहे. सकाळी काही साहित्य आणायला बाहेर जातो असे सांगून वैभव घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसात तक्रार केली.
advertisement
सकाळी कामासाठी बाहेर गेला अन्...
वैभव मोहोड सकाळी घरातून काही कामासाठी बाहेर गेला होता. बराचवेळ होऊनही तो घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क झाला नाही. उद्याच लग्न असल्यामुळे घरी पाहुणे आले, त्याला हळद लागणार असल्यामुळे घरात त्याची तयारी सुरू झाली होती. मात्र नियोजित त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली.
एटीएमवरून पैसे काढले
वैभव मोहोडचा बडनेरा जुन्या बायपासवरील एका हॉटेलमध्ये विवाह सोहळा आयोजित केला आहे. अखेर मंगळवारी दुपारी मुलाचे वडील आणि नातेवाइकांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तपास सुरू केला आहे. या मुलाने घरून बाहेर पडल्यानंतर सकाळी एटीएमवरून काही रक्कम विड्रॉल केली आहे. दरम्यान तो कुठे गेला आणि का गेला किंवा त्याचे कोणी अपहरण केले का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
