लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र याबाबत माहिती देताना संचालक डॉ. सतीश ठाकरे सांगतात की, आमची ही संस्था फक्त मंदिर म्हणून समाजात प्रचलित न राहता त्याची काही वेगळी एक ओळख असावी, असा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात काम करत आहोत. कोरोना काळ म्हटलं की, सगळ्यांना धडकी भरते. कारण त्याकाळात आपल्याच माणसांना आपल्याला हात लावताना नकार देताना आपण बघितलंय. सर्व मंदिरे बंद होती, त्याच काळात आमच्या येथे ही अभ्यासिका मुलांसाठी सुरू करण्यात आली.
advertisement
Success Story: वय 18 वर्षे, कॉलेज करत तरुणी विकतेय खिचिया पापड, महिन्याला 70000 कमाई!
प्रवेश घेण्यासाठी पात्रता आणि प्रोसेस काय?
लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र येथे प्रवेश घेण्याकरिता सर्वात आधी याठिकाणी येऊन माहिती घ्यावी लागते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला याठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. त्याचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. त्याचा कल स्पर्धा परीक्षेकडे असावा. या दोन बाबींनंतर त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर तो जर पात्र असेल तर त्याला प्रवेश दिला जातो. मुले - मुली कोणीही याठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. 40 जणांची पात्रता आहे. मात्र, 50 विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो, अशी माहिती सतीश ठाकरे यांनी दिली.
सुविधा कोणकोणत्या दिल्या जातात?
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह याठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर दोन वेळचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. आरोग्यासाठी दवाखाना याठिकाणी उपलब्ध आहे. 10 रुपये देऊन दवाखाना विद्यार्थी करू शकतात. जेवण आणि राहण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क लागत नाही. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या परीक्षा फी सुद्धा संस्थानकडून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना लागणारी सर्व पुस्तके, लॅपटॉप सुद्धा त्याठिकाणी उपलब्ध आहेत, डॉ. सतीश ठाकरे सांगतात.