अमरावती-सीएसएमटी मार्गावर विशेष गाडी
अमरावती-सीएसएमटी या मार्गावर चालवण्यात येणारी विशेष गाडी क्रमांक 01218 ही 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता अमरावतीहून सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पहाटे 5.25 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीची गाडी क्रमांक 01217 ही 7 डिसेंबर रोजी रात्री 12.40 वाजता मुंबईहून निघून दुपारी 12.50 वाजता अमरावतीत दाखल होईल. या गाड्यांना एकूण 18 कोच आहेत. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
advertisement
नागपूर-सीएसएमटी मार्गावरील फेऱ्या
बडनेरा स्थानकावरूनही नागपूर-सीएसएमटी मार्गावरील प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. 4 डिसेंबर रोजीची गाडी क्रमांक 01260 ही नागपूरहून सायंकाळी 6.15 वाजता सुटणार आहे. पुढील दिवशी सकाळी 10.55 वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे. ही गाडी रात्री 9.40 वाजता बडनेरा स्थानकावर येईल. त्याच मार्गावर गाडी क्रमांक 01262 ही नागपूरहून रात्री 11.55 वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी 3.50 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
5 डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 01264 नागपूरहून सकाळी 8 वाजता सुटणार आहे. बडनेरा येथे सकाळी 11.30 वाजता येईल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता मुंबईत पोहोचेल. नागपूर-मुंबई मार्गावरील गाडी क्रमांक 01266 हीसुद्धा सायंकाळी 6.15 वाजता नागपूरहून सुटून बडनेरा येथे सुमारे 9.30 वाजता थांबेल.
सीएसएमटी ते नागपूर चार परतीच्या फेऱ्या
सीएसएमटी ते नागपूर अशा चार परतीच्या फेऱ्याही प्रशासनाने नियोजित केल्या आहेत. त्यात 6 डिसेंबर रोजी चालवली जाणारी गाडी क्रमांक 01249 ही सीएसएमटीहून रात्री 8.50 वाजता निघून पुढील दिवशी सकाळी 11.20 वाजता नागपूरला पोहोचेल. तसेच 7 डिसेंबर रोजीची गाडी क्रमांक 01251 ही सकाळी 10.30 वाजता मुंबईहून सुटून रात्री 12.55 वाजता नागपूरला दाखल होईल. ही गाडी रात्री 9.30 च्या सुमारास बडनेराला थांबा देईल. 8 डिसेंबर रोजीची गाडी क्रमांक 01257 ही रात्री 12.20 वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता नागपूरला पोहोचेल. बडनेरा येथे या गाडीचे आगमन दुपारी 12.45 वाजता होईल.
दादर-नागपूर एक विशेष फेरी
याशिवाय, 7 डिसेंबर रोजी दादर-नागपूर अशी एक विशेष फेरीही देण्यात आली आहे. दादर-नागपूर गाडी क्रमांक 01253 ही रात्री 12.40 वाजता दादरहून सुटून त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता नागपूरला पोहोचेल. बडनेरा येथे या गाडीचा थांबा दुपारी 12.45 वाजता असेल. या विशेष गाड्यांना 18 कोचची मोठी रचना देण्यात आली आहे. नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जळंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांची मुंबईकडे होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने केलेली ही व्यापक तयारी प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. अमरावती, बडनेरा आणि नागपूर येथून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या विशेष गाड्या महत्त्वाची भूमिका निभावतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.






