रवी राणा यांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण
आमदार रवी राणा हे पुन्हा नव्या वादात अडकले आहेत. रवी राणा हे अंजनगाव सुर्जी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची पाहणी करत असताना ठाकरे गटाचा प्रमोद टीपटे हा कार्यकर्ता आला. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का करता? अशा जाब प्रमोद टीपटे यांनी रवी राणा यांना विचारला. रवी राणा यांच्यासोबत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने वाद घातला. राग अनावर आलेल्या रवी राणा यांनी थेट या कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील या कार्यकर्त्यांला मारहाण केली. त्यामुळे रवी राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
advertisement
रवी राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
आमदार रवी राणा हे सोमवारी दुपारी युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गेले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी रवी राणा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन त्याने रवी राणा यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव महेंद्र दिपटे असून तो शिवसेना ठाकरे गटाचा माजी तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे.
वाचा - 'जातीसाठी दोन पावलं मागे यायला तयार', जरांगे पाटलांच्या सरकारकडे 5 मागण्या
यावेळी रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर येणाऱ्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. अंजनगाव सुर्जी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. हल्ला करणारा व्यक्ती ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला असून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ही दावा रवी राणा यांनी केला आहे.