असे असणार नवीन वेळापत्रक
हिवाळी वेळापत्रकानुसार 2 जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, जानेवारी महिन्यासाठी पुन्हा एकदा वेळेत बदल जाहीर करण्यात आला आहे. अलायन्स एअरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7 ते 30 जानेवारीदरम्यान मुंबईहून सकाळी 9.55 वाजता विमान उड्डाण घेऊन 11.40 वाजता अमरावती विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर अमरावतीहून दुपारी 12.05 वाजता विमान मुंबईकडे झेपावेल आणि 1.50 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
प्रवाशांसाठी खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 'या' महिन्यात होणार सुरू
ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवस उपलब्ध राहणार आहे. आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बदलणारे वेळापत्रक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
1 फेब्रुवारीपासून पुन्हा बदल
दरम्यान, अलायन्स एअरने दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सकाळच्या वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार मुंबईहून सकाळी 7.05 वाजता उड्डाण घेऊन 8.50 वाजता अमरावतीत आगमन होईल, तर अमरावतीहून सकाळी 9.15 वाजता उड्डाण घेऊन 10.30 वाजता मुंबईत पोहोचेल.
अमरावती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होत असून, नव्या वेळापत्रकानुसार अमरावतीहून दुपारी 12.05 वाजता विमान मुंबईकडे झेपावेल, तर मुंबईहून सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळावर लँडिंग होईल. वेळापत्रकात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, स्थिर आणि निश्चित वेळापत्रक लवकर जाहीर करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.






