TRENDING:

Anil Kumar Pawar :मंत्री भुसेंच्या जावई असल्यामुळे..., भाजपकडे बोट दाखवत वकिलाचा कोर्टात स्फोटक दावा

Last Updated:

वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह तीन जणांना आज पीएमएलए कोर्टाने 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सूनावली आहे. या सुनावणी दरम्याना अनिल कुमार पवार यांच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Anil Kumar Pawar ED Custody : वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह तीन जणांना आज पीएमएलए कोर्टाने 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सूनावली आहे. या सुनावणी दरम्याना अनिल कुमार पवार यांच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. भाजप आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादामुळे ही कारवाई झाल्याचा दावा पवार यांच्या वकिलाने कोर्टात केला होता.त्यामुळे वकिलाच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
anil kumar pawar ed custody
anil kumar pawar ed custody
advertisement

माजी आयुक्त अनिल पवार यांच्यासह तिघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत अनिलकुमार पवार यांच्या वकिलांनी कोर्टात खळबळजनक दावे केले आहेत. अनिल पवार हे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्याच्या विरोधात अनेक खोट्या बातम्यांचा प्रचार प्रसार सूरू आहे.मिडिया आणि सोशल मीडियावर मोठी बदनामी होतेय.त्यामुळे अनिल पवार विरोधात मिडिया ट्रायल सूरू असल्याचा दावा पवार यांच्या वकिलाने केला. अशा प्रकारे अनिल पवार यांचं करिअरही दाव्याला लावण्याचं षडयंत्र आहे.

advertisement

अनिल पवार हे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत. त्यात दादा भूसे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय देखील आहेत. त्यामुळे दादा भुसे यांचे नातेवाईक असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या अतंर्गत वादातून ही कारवाई केल्याचा दावा कोर्टात केला गेला आहे.अनिल पवार हे राजकारण आणि राजकारण्यांचे ठरताय बळी असे देखीव त्यांच्या वकिलाने म्हटले आहे.

advertisement

ईडीने कोर्टात वसई-विरारमधील 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकामातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक अनिल कुमार पवार यांना अटक केल्याची माहिती दिली.त्याचसोबत आरोपींच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच घबाड जप्त केल्याची माहिती कोर्टाला दिली. आणि या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी ईडीने चारही आरोपींसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

छापेमारीत ईडीच्या हाती काय काय लागलं?

advertisement

वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर 41 अनधिकृत इमारती प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना बुधवारी रात्री ईडीने अटक केली होती. पवार यांच्यासह ईडीने नगररचनाकार वाय एस रेड्डी,सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांनाही अटक केली होती.

अनिल कुमार पवार यांच्यावर वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव 60 एकर भूखंडावर बांधण्यात आल्या होत्या 41 अनधिकृत इमारतीत मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीताराम गुप्ता यांच्यावर सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोंचा भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

या प्रकरणातील यापूर्वीच्या छाप्यात 8 कोटी 94 लाख रोख,23 कोटी 25 लाखाचे हिरे,13 कोटी 86 लाखाचे शेअर्स अणि गुंतवणूक,ED ने केल्या आहेत जप्ततर 29 जुलैला अनिल पवार यांच्या नाशिक येथील पुतण्या जनार्दन पवारचा घरी 1 कोटी 33 लाखाची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात सनदी लेखापाल,वास्तुविशारद,कनिष्ठ अभियंते,ठेकेदार, बडे अधिकारी आणि अनेक एजंट आहेत ED च्या रडारवर आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anil Kumar Pawar :मंत्री भुसेंच्या जावई असल्यामुळे..., भाजपकडे बोट दाखवत वकिलाचा कोर्टात स्फोटक दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल