ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांचे पूत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. ज्योती रामदास कदम यांनी 1993 साली आत्महत्येचा प्रयत्न का केला? त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न का केला? जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळलं? याची चौकशी झाली पाहिजे. आजही खेडमध्ये याचे साक्षीदार आहेत. वेळ पडली तर मी त्यांनाही समोर आणू शकतो. खूप जण त्याचे साक्षीदार आहेत. ते स्वत: समोरून सांगतात की आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा, असंही अनिल परब म्हणाले.
advertisement
अनिल परब पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
रामदास कदम यांना माफी मागावीच लागेल, नाहीतर त्यांना कोर्टात खेचणार आहे. रामदास कदमांविरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत. मेलेल्या माणसाचे ठसे घेतले तरी त्याचा काही उपयोग होत नाही, त्यांचं ज्ञान कच्चं आहे. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विष कालवण्यासाठी, घृणा तयार करण्यासाठी, हे वक्तव्य केलं आहे. शिशुपालाचे आता शंभर अपराध पूर्ण झाले आहेत. येत्या विधानसभेत मी सगळं मांडणार आहे, असंही अनिल परब म्हणाले.
योगेश कदमांना आव्हान देताना अनिल परब म्हणाले, "१९९३ साली तुझ्या आईनं आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला, स्वत:ला जाळून घेण्याचा का प्रयत्न केला, याची चौकशी कर. रामदास कदमांच्या पुतण्याने का आत्महत्या केली? याची चौकशी करा. घरातील लोक आत्महत्या करत आहेत. कशासाठी करत आहेत. हे बाहेर आलं पाहिजे."
"ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, त्यांनी जाळून घेण्याचा का प्रयत्न केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळलं, याची चौकशी झाली पाहिजे, आजही खेडमध्ये याचे साक्षीदार आहेत. वेळ पडली तर मी त्यांनाही समोर आणू शकतो, खूप जण त्याचे साक्षीदार आहेत. ते स्वत: समोरून सांगतात की आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा", असंही अनिल परब म्हणाले.