TRENDING:

Yugendra Pawar : पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत लागले पोस्टर

Last Updated:

लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर शरद पवार बारामतीमध्ये जनसंवाद दौरा करत आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यात पवार कुटुंबातली आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत लागले पोस्टर
पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत लागले पोस्टर
advertisement

पुणे : लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर शरद पवार बारामतीमध्ये जनसंवाद दौरा करत आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यात पवार कुटुंबातली आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण शरद पवारांच्या बारामती दौऱ्यातल्या पोस्टरमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीमधल्या लोणी भापकर गावात युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून पोस्टर लागले आहेत.

advertisement

दरम्यान शरद पवारांच्या जनसंवाद सभेमध्ये कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरच युगेंद्र पवारांना आमदारकीचं तिकीट देण्याची जाहीर मागणी केली, त्यावर युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही लोक मला सुरूवातीलाच अडचणीत आणणार बहुतेक, असा मिश्किल टोला युगेंद्र पवारांनी लगावला आहे. याच सभेत बोलताना माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीही युगेंद्र पवारांना नेतृत्व द्यावं, अशी विनंती शरद पवारांकडे केली.

advertisement

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबाने अजित पवारांविरोधात उघडपणे भूमिका घेत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासूनच युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. बारामतीतून युगेंद्र पवार विधानसभेला उभे राहिले तर त्यांचा सामना अजित पवारांशी होईल, तसंच बारामतीमध्ये काका-पुतण्या यांच्यात लढत होऊ शकते.

advertisement

आतापर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार हे सक्रीय राजकारणात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पूत्र पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर 2024 च्या निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढल्या. लोकसभेतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yugendra Pawar : पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात? बारामतीत लागले पोस्टर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल