या दुकानाला 80 वर्षांची परंपरा आहे. तांब्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या दुकानात नवरात्रीच्या पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या देवीच्या मूर्ती तसेच पूजेसाठी लागणार तांबा-पितळेचं इतर साहित्य स्वस्त आणि शुद्ध स्वरुपात मिळत असल्याने नागरिक यांच्याकडे येतात.
Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम ?
advertisement
आंबेकर बंधू गेल्या 80 वर्षांपासून तांबा-पितळेच्या वस्तू घडवण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यांच्याकडे तांबा-पितळेच्या अँटिक वस्तू मिळत असल्याने नाशिककरांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. नवरात्रीसाठी लागणाऱ्या पितळी दिव्यांचे अनेक प्रकार दुकानात उपलब्ध आहेत. चावीचे दिवे, काचेचे दिवे, तांब्याचे दिवे, पितळी दिवे, लहान समई आणि मोठी समई असे दिव्यांचे प्रकार योग्य किमतीत मिळत आहेत. इतकेच नाही तर नवदुर्गांची रूपं असलेल्या मूर्ती देखील या दुकानात उपलब्ध आहेत.
ज्ञानेश्वर शंकर आंबेकर हे दुकान तांबा-पितळेच्या अँटिक वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे. याठिकाणी पूजेच्या साहित्या व्यतिरिक्त तांब्यापासून बनवलेल्या गृहसजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तू देखील होलसेल आणि रिटेल स्वरुपात उपलब्ध आहेत. नाशिकमधील भांडी बाजारातील बालाजी मंदिराच्या बाजूला हे दुकान आहे.