माजलगाव शहराजवळील देवखेडा येथील रहिवासी राजाराम धोंडीराम जोगडे यांची जुन्या मोंढा भागात सुमारे 1800 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाची जागा होती. त्यांच्या मृत्यूनंतर वारस नसल्याने नातेवाईकांनी मालकी हक्काचा दावा केल्यामुळे ही जागा वादग्रस्त ठरली होती. बाळासाहेब जोगडे यांनी बोगस ना हरकत प्रमाणपत्र तयार करून सदर जागेची 15 सप्टेंबर 2025 रोजी प्रल्हाद सूर्यकांत होके यांना रजिस्ट्री करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी जुनी पीटीआर वापरण्यात आली असून तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश चौधरी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे.
advertisement
कोणावर गुन्हा दाखल झाला?
या प्रकरणात बाळासाहेब तुकाराम जोगडे (रा. देवखेडा) मालमत्ता विक्रेता प्रल्हाद सूर्यकांत होके(रा. पाटील गल्ली, माजलगाव) मालमत्ता खरेदीदार इमरान मुस्तफा खान (रा. गांधनपुरा, माजलगाव) – साक्षीदार , प्रकाश उत्तमराव होके (रा. पाटील गल्ली, माजलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगावात जमीन हडपण्याचे प्रकार वाढले
माजलगाव आणि आसपासच्या परिसरातील जमिनीचे भाव दिवसागणिक प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. गुंडागर्दी करून, धमकावून, जमिनीवर कब्जा करण्याचे प्रयत्न होत आहेत. वेळीच या गुंडांना आवरले नाही तर शांत आणि वास्तव्यासाठी सुरक्षित अशा माजलगावची असलेली ओळख धूसर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
