'छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन
साउथ सेंट्रल रेल्वेने (दक्षिण मध्य रेल्वे) औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन असं केलं आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे. या नामकरणानंतर आता रेल्वेच्या नोंदी आणि प्रवाशांसाठीच्या माहितीमध्ये हे बदल त्वरित लागू होतील. यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं केलं आहे.
advertisement
साउथ सेंट्रल रेल्वेची घोषणा
महाराष्ट्र सरकारने केलेल्या औरंगाबादचं नामकरणानंतर आता रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात आले आहे. साउथ सेंट्रल रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्थानकाचा उल्लेख आता यापुढे 'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' म्हणून केला जाईल.
दरम्यान, महायुती सरकारने 15 ऑक्टोबर रोजी औपचारिक अधिसूचना जारी करून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश दिले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची सुरुवात 1900 मध्ये झाली, जेव्हा हैदराबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या काळात शहर विकसित होत होते. हे स्थानक त्या काळातील रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जात असे.
