कोणत्या कार्यालयावर कोणत्या आकाराचा राष्ट्रध्वज?
विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि हर्सूल कारागृह या चारही कार्यालयांमध्ये 8 बाय 12 फूट आकार असलेला झेंडा फडकवण्यात येतो. हाय कोर्टाचं औरंगाबाद खंडपीठ आणि जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी 3 बाय 4.50 फूट आकाराचा झेंडा फडकवण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 4 बाय 9 फूट आकाराचा ध्वज फडकवला जातो. जिल्हा परिषद कार्यालयासमोर 4 बाय 4 फूट आकाराचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
advertisement
गजबजलेल्या रस्त्यावर उभा स्वातंत्र्यलढ्याचा अमूल्य वारसा, अनेक दिग्गजांची होती उठबस
शहरातील सर्व महाविद्यालयांना 4 बाय 6 फूट आकाराचा राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी आहे. प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि ग्रामपंचायत कार्यालयांना 2 बाय 3 फूट आणि 3 बाय 4.50 फूट आकाराच्या ध्वजाचं ध्वजारोहण करता येतं. बँका, सोसायटी, खासगी कार्यालयांना 2 बाय 3 फूट आकाराचा ध्वज फडकवण्याची परवानगी आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंच तिरंगा फडकवण्यात येतो. किल्ल्यावरील सर्वात मोठी मेंढा तोफ असलेल्या ठिकाणी दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते. या ठिकाणी 8 बाय 12 फूट आकाराचा राष्ट्रध्वज वापरला जातो.