बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार घडला आहे. इथं महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेले बाळ मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागले.
यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत, या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केले. या प्रकाराची रुग्णालयात चर्चा होत असून आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टर वर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.
advertisement
केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबाबाबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला? यामध्ये दोषी कोण? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
