बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचाली विषयी भूमिका स्पष्ट करत आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत दिले.
गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. आता शेवट पुन्हा भाजपात मी प्रवेश केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मी प्रवेशासाठी विनंती केली होती अखेर याला मुहूर्त मिळाला असून परळी येथे मी भाजपात प्रवेश केला. आता मुंबई येथे प्रवेश सोहळा देखील होणार असल्याची माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली.
advertisement
कोण आहेत बदामराव पंडित?
बदामराव पंडीत हे बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. गेवराईत बदामराव पंडित यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद नक्कीच वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरणार शकतो. गेवराईच्या राजकारणात बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्यात कायमच राजकीय संघर्ष राहिला आहे.
