मिळालेल्या माहितीनुसार पीडित कारचालक भाऊसाहेब आव्हाड आपल्या मुलीला कारने घ्यायला निघाले होते.मुलीला शाळेतून घेऊन आल्यानंतर त्यांनी कार रस्त्याच्याकडेला लावली होती.या दरम्यान त्याच्याच जवळून रिक्षा घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने कारला रिक्षा घासल्याची घटना घडली होती. ही घटना पाहताच कारचालक भाऊसाहेब आव्हाड यांनी रिक्षाचालकाला जाब विचारायला सूरूवात केली.
advertisement
पण या उलट रिक्षाचालकानेच त्यांच्यासोबत मुजोरी करायला सूरूवात केली. रिक्षाचालकाने सूरूवातीला त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर या वादातून रिक्षाचालकाने रस्त्यावरचा दगड उचलून कारचालकाच्या पायावर घातला होता.यामध्ये आव्हाड यांचा पाय रक्तबंबाळ झाला होता.त्यानंतरही रिक्षा चालकाची मुजोरी काय संपली नाही,त्याने कारच्या मागच्या काचेवर दगड फेकून कारचेही आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता.विशेष म्हणजे त्यावेळेस शाळकरी मुलगीही कारमध्ये बसली होती.या घटनेनंतर रिक्षाचालकाने पळ काढला होता.
या घटनेवर बोलताना आव्हाड यांनी पत्नी म्हणाली, रिक्षाचालकाने आधी कारला रिक्षा घासली.त्यानंतर जाब विचारला असता त्याने बाचाबाची करण्यास सूरूवात केली. या बाचाबाची दरम्यान रिक्षाचालकाने आव्हाड यांच्या पायावर भलामोठा दगड टाकला होता.यामध्ये आव्हाड गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी त्यांच्या पायाला टाके पडल्याचे त्यांनी सांगितले.तसेच त्यांचा हात पण फ्रॅक्चर झाला आहे. पोरी गाडीतच होत्या एकट्या त्यावेळी त्याने गाडीवरही दगड मारला. मलाही त्याने शिविगाळ केली,असा आरोप आव्हाड यांच्या पत्नीने केला आहे.
या घटनेनंतक रिक्षाचालक फरार झाला आहे.तसेच अद्याप तरी या प्रकरणात कोणतीही तक्रार झाल्याची माहिती आहे.पण या घटनेने नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.