TRENDING:

भाजपचा बहुजन विकास आघाडीला दणका, महापालिका निवडणुकांआधी फोडाफोडी

Last Updated:

Mahapalika Election: वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी, वसई विरार : महापालिका निवडणुका जाहीर व्हायला अवघे काही आठवडे शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला दणका दिला आहे. बहुजन विकास आघाडीची जिथे ताकद आहे त्याच पट्ट्यातील माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दणका दिला आहे.
रविंद्र चव्हाण (भाजप प्रदेशाध्यक्ष)
रविंद्र चव्हाण (भाजप प्रदेशाध्यक्ष)
advertisement

वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्नेहा दुबे पंडित यांच्या माध्यमातून हे प्रवेश पार पडले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पक्ष प्रवेशाला हजर होते.

बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सरदार छोटू आनंद, सामाजिक कार्यकर्ते राजू इसाई, विशेष कार्यकारी अधिकारी सरदार रविंद्र सिंग आनंद, युथ काँग्रेसचे माजी सरचिटणीस करणदीप सिंग अरोरा, तसेच प्रतिष्ठित व्यावसायिक, माजी अधिकारी आणि विविध समाज घटकांतील अनेकांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

रविंद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षाचील अनेक बड्या चेहऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने खालपर्यंत लक्ष घातले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या, असा प्रण भाजपने केल्याने येत्या काळात पक्षप्रवेशाला रीघ लागलेली दिसेल तसेच फोडाफोडीच्या राजकारणात ऊत येईल, असे राजकीय जाणकार सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचा बहुजन विकास आघाडीला दणका, महापालिका निवडणुकांआधी फोडाफोडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल