धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर भागात राहणाऱ्या डिंपल मनोहर वानखेडे या आठ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डिंपल आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना फुगा फुग्वताना तो अचानक तोंडातच फुटल्याने फुग्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. घशात फुग्याचा तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. यावेळी घरच्यांच्या लक्ष्यात येताच तातडीने तिला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
advertisement
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अवघ्या आठ वर्षीय डिंपलचा फुगा फुगवताना झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुलं खेळताना कृपया हलगर्जीपणा न करता मुलांवर लक्ष ठेवा व त्यांची काळजी घेण्याच आवाहन मयत डिंपलच्या पालकांनी केल आहे.
मुलांकडे लक्ष द्या...
आपण लहान मुलांना खेळण्यासाठी सहज मुलांना फुगे घेऊन देतो. लहान मुलं कोणतीही गोष्ट तोंडात घालतात पण त्यांच्याकडे पालकांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सध्या छोट्या-छोट्या गोष्टी मोठा परिणाम करून जातात. त्यामुळे मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. मुलं सहज तोंडात पैसे घालतात. अशातून अनेक दुख:द घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुमची मुलं काय करतात याकडे बारीक लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. डिंपलसोबत झालेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर पोटचा गोळा अशा पद्धतीने दुरावल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे