माजलगाव येथील तहसील कार्यालयात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरू होती. यावेळी शेख तौफिक अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सहाल चाऊस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सहल चाऊस यांच्या गटाने शेख तौफिक यांच्या घराच्या समोर फटाके वाजवून शिव्या देत धुडगूस घातला.
advertisement
असद चाऊस, जैद असद चाऊस आणि त्यांच्या अनोळखी १० ते १५ सहकाऱ्यांनी तौफिक यांच्या घरासमोर येऊन सहाल चाऊस यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप का घेतला या कारणावरून शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
November 20, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवार चिडला, १५ जणांसोबत घरासमोर धुडगूस घातला, बीडमध्ये राडा
