TRENDING:

गेवराईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार भाजपच्या गळाला; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत प्रवेश

Last Updated:

ऐन स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गेवराईत मोठा हादरा बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का गेवराई मतदार संघात बसला आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळी येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
News18
News18
advertisement

निवडणुकीपूर्वी झालेला हा प्रवेश आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांना मोठे आव्हान ठरणार असून या ठिकाणची राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. तसेच विधानसभेत एकमेकांच्या विरोधात लढलेले लक्ष्मण पवार व त्यांचे बंधू बाळराजे पवार हे देखील आता भाजपात सक्रिय झाले असून ते बदामराव पंडित यांच्या बरोबरीने आगामी निवडणुकात सक्रिय राहणार असल्याने या ठिकाणी भाजपाला मोठे बळ मिळाले आहे

advertisement

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला जसा जसा वेग येत आहे. तसतसे राजकीय वातावरण गरम होत आहे.राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत तर राजकीय नेते देखील पक्षांत्तर करु लागले आहे. अनेक नेते विविध पक्षांच्या संपर्कात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बदमराव पडिंताच्या प्रवेशाची चर्चा होती. अखेर आज त्यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

advertisement

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

1995 आणि 1999 साली बदामरावांनी अपक्ष बाजी मारली. तर, 2009 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधीमंडळात पोचले. मागच्या काही वर्षांपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत होते. आता त्यांनी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप त्यांना बीड जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते.

advertisement

आगामी  निवडणुकीत मोठं आव्हान

दरम्यान, ऐन स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात बदामराव यांचा भाजपचा प्रवेश शिवसेना उद्धव ठाकरे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पक्षाला गेवराईत मोठा हादरा बसला आहे. . बदामराव पंडित यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांना येणा-या निवडणुकीत एक आव्हान असणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गेवराईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार भाजपच्या गळाला; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत प्रवेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल