विलास मस्के यांच्या पालवन येथील घरी पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही नेमका हल्ला कोणी केला का केला पोलीस तपासात समोर येणार आहे. मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. धारधार शस्त्राने वार करत ही मारहाण करण्यात आली आहे. बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं.
advertisement
विलास मस्के यांची प्रकृती गंभीर
एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासोबत बीड मधील वैद्यकीय मदत कक्षाचे गेल्या तीन वर्षांपासून मस्के हे काम पाहतात. विलास मस्के हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. विलास मस्के यांची प्रकृती गंभीर असून धारदार शस्त्राचे वार आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
आरोपींना तात्काळ अटक करा, कुटुंबियांची मागणी
एकीकडे बीडचे नवे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच बीडमध्ये आता हा प्रकार समोर आल्याने मोठी खबळळ उडाली आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
