राज्याच्या गृह विभागाने 7 ऑगस्ट रोजी बीडसाठी माणिक बेद्रे, केजसाठी शैलेश संखे तर माजलगावसाठी सुधाकर गायकवाड यांची डीवायएसपी म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु आदेश येऊन 17 दिवस झाले तरी हे अधिकारी रुजू झालेले नाहीत.. दुसरीकडे गेवराईचे डीवायएसपी निरज राजगुरु यांची बदली झाली तरी त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
advertisement
बीड जिल्ह्याची प्रतिमा, पोलिसांवरील सातत्याचे आरोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर जिल्ह्यांतील अधिकारी येथे येण्यास तयार नाहीत. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता नोकरी धोक्यात येईल की काय, अशी भीती वाटते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी अड्डा राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यात सुरु असलेली गुन्हेगारी, प्रशासनावरील दबावामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नकोच....
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नको.. अशी स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे पोलिस अधिक्षकांकडून बीड जिल्ह्यातील पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचे काम केले जात आहे तर दुसरीकडे नवीन अधिकारीच रुजू व्हायला तयार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
