अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना बीडमधील शेतकऱ्यांवर आता नवीन संकट ओढवलं आहे. बीडच्या कपिलधारवाडी गावात जमिनीला भेगा पडल्याच्या, भिंतीला तडे गेल्याच्या आणि रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या भेगा पडल्याची घटना घडली आहे.
बीडच्या कपिलधारवाडी गावात जमीनीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत.या भेगांमुळे भिंतीला तडे गेले आहेत.त्यामुळे गावकरी दहशतीखाली आहे.कपिलधार हे गाव डोंगराच्या पायथ्याला आहे.भूगर्भातील पोकळी मध्ये पाणी गेल्याने हवा वरच्या येण्यासाठी ज्या ठिकाणी कच्ची जमीन आहे तिथे भेगा पडल्याच कारण भूवैज्ञानिकांनी सांगितला आहे.
advertisement
beed kapildhar wadi
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थिती याच भूगर्भातील पोकळी मध्ये पाणी गेल्याने या भेगा पडल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामुळे गावकरी दहशतीखाली आहेत. तहसीलदार यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. भूगर्भ शास्त्रज्ञ यांनीही या ठिकाणी पाहणी करून नेमकी कारणे काय आहेत या संदर्भात शोध सुरू आहे. या दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.
दरम्यान काही घराच्या भिंती पडल्या आहेत तर रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्याने. भू - अस्खलनाचा हा प्रकार आहे का? असा असेल तर गावचे पुनर्वसन व सुरक्षित सगळे स्थलांतर कधी केला जाणार हे पहावं लागणार आहे.