शिवराज बांगर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या संदर्भातील धक्कादायक गौप्यस्फोट केले.सुमारे आठ महिन्यांनंतर जाहीर सभेत बोलताना आपल्याला नाहक बदनाम केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. माझ्यावर हेतुपुरस्सर आरोप करून मला, बीड जिल्ह्याला आणि माझ्या जातीला बदनाम केले गेले, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यावर बोलताना हर गलती में आप हो, हर गुनाह में आप हो, समाज के गुन्हेगार आप हो, सबके गुन्हेगार आप ही हो, असे म्हणत शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडे यांना दोषी धरले.
advertisement
माझे हात पाय तोडताना वाल्मिकला Live बघायचे होते
माझ्याही खुनाची सुपारी वाल्मीक कराड याने दिली होती. माझे हातपाय तोडताना वाल्मीक कराड याला लाईव्ह पाहायचे होतं. ज्याला सुपारी दिली त्या सनी आठवले याने खून केला नाही म्हणून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा गंभीर आरोपही शिवराज बांगर यांनी केला आहे.
बबन गिते परळी विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार होणार होते. त्यांना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी वाल्मीकने प्रयत्न केले. गरीब बापू आंधळेंच्या पाठीमागे कुणी नव्हते. त्यांची हत्या गोट्या गीते आणि गँगने वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून केली. त्या गुन्ह्यामध्ये महादेव गित्तेला गोळ्या घातल्या, तो सध्या तुरुंगात आहे. विधानसभेला बबन गीते आडवा येईल म्हणून केवळ आणि केवळ ही हत्या केली. विशेष तपास समिती (एसआयटी) नेमून बापू आंधळे खून प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवराज बांगर यांनी केली.
