धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच आरोपी नारायण शिंदे याने या महिलेकडून एक कोटी दहा लाख रुपये घेऊन पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे म्हणत फसवणूक केली. जर तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे असे सांगून त्याने धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नारायण शिंदे याचा शोध आता शिवाजीनगर पोलीस घेत आहेत..
advertisement
प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक कराडचा कॉल
नारायण शिंदे याने महिलेवर अत्याचार करत तिला एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात 23 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. यानंतर नारायण शिंदे याच्या वतीने वाल्मिक कराडने फोन करत आपण बसून तुमचे प्रकरण मिटवू, असे म्हणाला. तसेच आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी परळी येथील कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत या महिलेसह आरोपी नारायण शिंदे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, अविनाश नाईकवाडे आणि बुधवंत हे उपस्थित होते. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यांनी केलेल्या फसवणुकीबाबत भरपाई रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये मला धनंजय मुंडे यांच्यामार्फत देणार होता. परंतु त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे याने त्याची पुर्तता केली नाही. मी त्यांना याबाबत विनंती देखील केली, परंतु त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कोणीही काहीही दाद दिली नाही, असा आरोप या महिलेने केले आहे.