मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या ज्ञानराधा बँकेत 3500 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दोघेही आरोपी असून तुरुंगात मुक्कामी आहे. शनिवारी दुपारी या दोघांना केज न्यायालयातून बीडकडे घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनला अपघात झाला. येळंब घाट परिसरात दुचाकीला धडक दिली यामध्ये दोन तरूण अति गंभीर जखमी झाले होते. यातील वाघे बाभुळगाव येथील अमोल हांडगे नामक तरूणाचा मृत्यू झाला आहे तर विक्रम हांडगे नामक तरूणावर उपचार सुरू आहेत.
advertisement
सुरेश कुटे आणि अर्चना कुटेंचा काय आहे घोटाळा?
बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकमध्ये हा घोटाळा झाला आहे. बँकेचे संस्थापक सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे या दोघांनी जवळपास ३,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केला होता. अनेक महिन्यांपासून दोघेही फरार होते. अखेरील गुन्हे शाखेनं १७ सप्टेंबर २०२५ मध्ये कुटे दाम्पत्यांना पुण्यातील बाणेर परिसरातून अटक केली होती. कुटे दाम्पत्याने जवळपास बँकेतील ४ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केली. बँकेतील पैसे हे त्यांनी आपल्याा मालकीच्या असलेल्या कुटे ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना कर्ज दिले होते. या दाम्पत्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप झाला आहे. या प्रकरणाचा ईडीने तपास करत आहे. ईडीने मागील वर्षीच जानेवारी २०२५ मध्ये सुरेश कुटेंना अटक केली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर हे दाम्पत्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
कुटे दाम्पत्य बीजमधील मोठं प्रस्थ
महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.
हे ही वाचा :
