नवरा-बायकोतील भांडणे भरोसा सेलमध्ये आली. बायको नांदण्यास तयार होती, परंतू पतीने नकार दिला. अशातच आपल्यावर गुन्हा दाखल केल्यास आपण आत्महत्या करू, असा ईमेल सहा दिवसांपूर्वी पतीने पोलिसांना पाठविला. त्याप्रमाणे आज आपण दुपारच्या सुमारास या पतीने तळ मजल्यातील भरोसा सेलसमोरच विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.
advertisement
बबन श्रीराम पाखरे (रा.पाडळी ता.शिरूकासार) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. नवरा छळ करून मारहाण करत असल्याची तक्रार पत्नीने भरोसा सेलला केली होती. पतीच्या तक्रारीनंतर दोन तारखा झाल्या. बबन पाखरे यांच्याकडून समेट घडविण्यास पूर्णपणे नकार होता. त्यामुळे त्याच्यावर छळाचा गुन्हा दाखल होणार होता. हे समजल्यानेच त्याने सहा दिवसांपूर्वी पोलिसांना ई-मेल करून माझ्यावर अन्याय झाल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली होती. त्यादृष्टीने पोलीस सतर्क होते.
आज दुपारी भरोसा सेलमध्ये बोलणे सुरू असतानाच बबन तेथून बाहेर पळाला आणि त्याने सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर शाखांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखत, त्याच्या हातातली बाटली हिसकावली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
