अजित पवार यांच्या नेृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची गणिते जुळवित असताना बीडमध्ये पक्षात कुरबुरी सुरू आहेत. प्रकाश सोळंके आणि धनजंय मुंडे यांच्यात द्वंद्व थांबण्याचे नाव घेत नाही.
बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा विरोध होणार याची कल्पना मी यापूर्वीच अजित पवारांना दिली आहे. विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते. तेच आता देखील होणार आहे, असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.
advertisement
दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर आणि माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे. त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
