बीडच्या छोट्याशा पाटसरा गावातील सुभाष फुलमाळी यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पुणेच्या लोहगावमध्ये पाल ठोकून राहिले. अठरा विश्व दारिद्र्य असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवणेच मुश्कील असताना घरात तीन पैलवान बनवणे मोठे धैर्याचे काम होते. पण फुलमाळी यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलाला पैलवान बनवले. आई वडिलांनी पुण्यासारख्या शहरात दारोदारी जाउन सुया पोती विकून मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी काबाडकष्ट केले.
advertisement
रोज सकाळी उठून स्वतः वडिलांनी मुलांना घरीच कुस्तीचे डाव शिकवत होते. मोठ्या कष्टाने आम्ही मुलाला घडवले. मुलाच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्हाला घर द्यावे. आमदार धनंजय मुंडे यांनी एक वर्षापूर्वी आम्हाला मदत केल्याने आज हे यश पहायला मिळते, अशी प्रतिक्रिया सनीच्या आई वडिलांनी दिली. तर पालावर राहणाऱ्या सनीने मला ऑलिंपिक जिंकायची आहे. सरकारने मदत करावी, अशी मागणी
पाटसरा गावचे सरपंच अभय गर्जे यांनी सनी फुलमाळी यांच्या पालावर जाऊन जंगी स्वागत केले. तसेच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लवकरच सनी फुलमाळीचा नागरी सत्कार करून त्याला आर्थिक मदत देऊ, असे सांगितले.
पालावर राहणाऱ्या मुलाने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत देशाचे नाव रोशन केले आहे तसेच ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळविण्याची जिद्द चिकाटी आणि स्वप्नही पाहत आहे.
