TRENDING:

बीडमध्ये लॉजवर डांबलं, APIने सराफा व्यावसायिकाला 4 लाखांना लुटले, 24 तासात प्रकरणात नवा ट्विस्ट

Last Updated:

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी धमकी देऊन एका सराफा व्यावसायिकाला चार लाखांना लुटल्याची घटना उघडकीस आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी धमकी देऊन एका सराफा व्यावसायिकाला चार लाखांना लुटल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी मध्यरात्री उशिरा लॉजवर धाड टाकून सराफा व्यावसायिकाला धमकावलं होतं. तसेच त्यांना एका वेगळ्या लॉजवर नेऊन डांबून देखील ठेवल्याचा आरोप होता. या प्रकरणी संबंधित सराफा व्यावसायिकाने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे केली होती.
News18
News18
advertisement

त्यानंतर एएसपींनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तक्रारदार सराफा व्यावसायिकाने आश्चर्यकारकपणे तक्रार मागे घेतली. आपण गैरसमजातून आणि रागाच्या भरात तक्रार दिल्याचं जबाब सराफा व्यापाऱ्याने म्हटलं आहे. २४ तासांत व्यापाऱ्याने तक्रार मागे घेतल्याने या मागचा अर्थ काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे 24 नोव्हेंबर रोजी बीडला आले होते. रात्री उशीर झाल्याने ते बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. लॉजवर मुक्कामी असताना अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

पोलिसांनी जैन यांच्याकडे असलेले सोने आणि मोबाईल ताब्यात घेऊन संपर्क बंद केला. दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली. पण जैन यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे आरोपी पोलिसांनी मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले. ते चार लाख रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली. रात्रभर दुसऱ्या लॉजवर नेऊन डांबलं. पहाटेच्या वेळी आरोपींनी उर्वरित तीन लाख रुपये सकाळी बारा वाजेपर्यंत आणून दे, असे म्हणून सोडून दिलं. यानंतर जैन हे तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले आणि तक्रार दाखल केली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी तक्रार मागे घेतली आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये लॉजवर डांबलं, APIने सराफा व्यावसायिकाला 4 लाखांना लुटले, 24 तासात प्रकरणात नवा ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल