अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ७० प्रवासी अगदी थोडक्यात बचावले. यामुळे एसटी बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.
लातूर बस्थानकाचे भंडेराव सदाशिव या चालकाच्या प्रसंगावधानामुळे ७० प्रवासी वाचले. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणत थांबवली. टायर निखळून पडले त्यावेळेला बस मधून ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. मात्र भंगारात घालण्याची वेळ आलेल्या अनेक बसेस रस्त्यावर धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे जीव रोज धोक्यात आहेत, अशा उद्विग्न भावना प्रवाशांनी घटनेनंतर बोलून दाखवल्या.
advertisement
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jul 26, 2025 8:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चालत्या एसटीचे दोन टायर्स निखळले, ७० प्रवासी थोडक्यात वाचले, बीडमधला थरारक प्रसंग
