दारुची बाटली घेऊन ते वर्गातही पोहोचले होते. परंतु सजग ग्रामस्थांनी वर्ग खोलीत येऊन हा प्रकार उघडकीस आणला. याचा व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आला असून या सर्व प्रकारामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
या शिक्षकाच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे तसेच संबंधित शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वर्गातच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
प्रकरण नेमकं काय?
शिक्षकाने शाळेत येताना पाण्याच्या बाटलीत दारू भरून आणली होती, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांनी यासंबंधी विचारणा केली. मात्र येताना रस्त्यात मला ही बाटली सापडली. त्या बाटलीत पाणी भरून मला ती बाटली फेकून द्यायची होती, अशी सारवासारव शिक्षकाने करण्याचा प्रयत्न केला. मात्र सजग नागरिकांनी शिक्षकाचा प्रताप व्हिडीओत कैद केला.
रस्त्यात सापडलेली बाटली तुम्ही शाळेत कशी आणली, अशी विचारणा नागरिकांनी केली. त्यावर शाळेसमोरील काकू त्यांच्या घरासमोर काहीही टाकू देत नाहीत, म्हणून त्यात पाणी भरून मी ती बाटली फेकून देणार होतो, असा बचाव शिक्षकाने केला.
