बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यात वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर तब्बल तीन तास युक्तिवाद करण्यात आला. तसेच विष्णू चाटे यांच्या दोष मुक्ती अर्जावरही युक्तिवाद करण्यात आला. वाल्मिक कराड याचे वकील सत्यव्रत जोशी यांनी तब्बल 1.45 मिनिट युक्तिवाद केला. त्यानंतर विष्णू चाटेचे वकील शहा यांनी दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. वाल्मिक कराड याला जामीन देऊ नये आणि विष्णू चाटेचा दोष मुक्ती अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये तब्बल तीन तास आरोप प्रत्यारोप आणि युक्तिवाद चालला.
advertisement
वाल्मिक कराडचे वकील सत्यव्रत जोशी यांनी युक्तिवाद करताना जामीन देण्यात यावा यासाठी प्रामुख्याने खालील मुद्दे मांडले.
वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद
- गुन्हेगारी टोळी यावर आक्षेप घेत दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्हा संदर्भात मांडणी केली. यात 19 गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यासमवेत एकही या प्रकरणातील आरोपी नाही. त्यातील 11 गुन्हे हे 1 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणारे आहेत. संघटित गुन्हेगारी या सर्व आरोपीने एकत्रित केलेली गुन्हे कुठे आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोषारोप पत्र दाखल केलेला एकाच गुन्हा एकत्र दिसत आहे. त्यामुळे मकोका लावण्यास सक्षम ग्राउंड्स नाहीत..(बॉम्बे हायकोर्टाचे जुन्या निकालाचे संदर्भ देण्यात आले, यात महम्मद सय्यद केस, गोपाल पांडे केस)
- वाल्मिक कराडवर मकोका ? असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केला. तसेच यावेळी मकोका लावताना, सक्षम ग्राउंड नव्हते. त्यानंतर तीनही गुन्ह्याचे दोषारोपपत्र एकत्र दाखल कसे केले. वाल्मिक कराड यांचे सी आय डी चे तपासणी अधिकारी यांच्या 5 जानेवारीच्या अहवालात नाव नाही.. फायनल अहवालात नाव नाही.
- वाल्मिक कराड याच्या विरोधात ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या सुनील केदु शिंदे याच्या 29 नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराचा उल्लेख, आणि 164 नुसार त्याचा घेतलेलं जबाब यावर हरकत घेत.. कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ यांची तारीख 15 डिसेंबर कशी? असा सवाल उपस्थित केला. यावेळी सुनील शिंदे यांनी लिहून दिलेला जबाब वाचण्यात आला. माझ्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने रेकॉर्ड केलं आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला असा उल्लेख आहे.तसेच या 164 च्या जबाबात दोन कोटीचा उल्लेख नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणा त आमचा काही संबंध नाही.. अशी मांडणी केली.
- पोलीस दोषारोप पत्र एकत्र कसे देऊ शकतात याला कोर्टाचे परवानगी घेतली होती का असावा नाही उपस्थित करण्यात आला. खंडणीची रक्कम दिली किंवा घेतली यासंदर्भात ही पुरावे आढळून आले नाहीत. सुनील शिंदे यांच्या जबाबात व संवादात.. पैशाचा उल्लेख नाही. फक्तं नॉर्मल धमकी आहे.. यात नमस्कार विष्णू चाटे अण्णा बोलणार आहेत.. या संवादाचाही उल्लेख करण्यात आला. तसेच सुदर्शन घुले याचा जबाब घेतला गेला नाही. अस त्यांनी स्वतः न्यायालयाला सांगितला आहे. असा उल्लेख केला..
- गोपनीय जबाबामध्ये सुदर्शन घुले याच्या मारहाणीचा बदला घेऊन सरपंचाचा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे यात वाल्मिक कराड याचा उल्लेख नाही.. महेश केदार ,जयराम चाटे यांच्या जबाबाचा उल्लेख नाही. कट रचला या कटात वाल्मिक कराड कुठेही प्रत्यक्ष उपस्थित नाहीत..
- वाल्मिक कराड याच्या अटकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अटकेसाठी पुरेशी ग्राउंड नव्हते. अटक केली त्यावेळी वाल्मिक कराडच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांना सांगितले नाही. रोहित कांबळे नावाच्या व्यक्तीला सांगितले. तो कराड कुटुंबाचा सदस्य नाही.. अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यासंदर्भात रोहित कांबळेलाच सांगितले कुटुंबातील इतर सदस्यांना कळवले नाही. त्यामुळे अटकच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.अटकेसाठी खोटे ग्राउंड वापरले, अटकच बेकायदेशीर आहे.
वाल्मिक कराडवर दाखल असलेले गुन्हे मकोका लावण्यासाठी सबळ आहेत का? 1999 पासूनच्या केसचा दोषारोप पत्रामध्ये उल्लेख आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल बनसोडे आणि दादासाहेब खिंडकर यांचा जवाब 10 डिसेंबर 2024 चा आहे. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी शिवराज देशमुख यांचा मूळ फिर्यादी यांचा जॉब यामध्ये तफावत आहे.
विष्णू चाटेच्या वकिलांचा युक्तिवाद
- विष्णू चाटे त याच्यावर अगोदर कुठलाही गुन्हा नाही साधी एनसी पण नाही. महेश आणि जयराम याच्या जबाबत विष्णू चाटेचा उल्लेख नाही.
- सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे.. यात सुनील शिंदे च्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आले नाहीत नंतर क्रिएट केले आहे. व्हिडिओ हा पण सुनील शिंदे यांच्या मोबाईल मधील नाही. सुदर्शन घुले गँग लीडर आहे तर गँग लिडरला विष्णू चाटे कसं सांगू शकतो.
सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद
- 29 नोव्हेंबर रोजी कॉल संदर्भात सी डी आर पुरवा.. 63 सेकंद .. 29 डिसेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज..
- संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील वैभवी अश्विनी आणि धनंजय देशमुख यांच्या जबाबाचा उल्लेख..
- वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने जुळले आहेत. यासंदर्भात फॉरेन्सिक तपासणी अहवाल..
आरोपीचे वकील शहा
- सीडीआरच्या पुराव्यावर आक्षेप घेतला.. तसेच फिर्यादीने दिलेल्या जवाबाचा उल्लेख केला..