नेमकं काय घडलं?
बीडच्या चऱ्हाटा गावामध्ये हा प्रकार घडला. जागेच्या जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका कुटुंबातील मायलेकी आणि अन्य एका महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लोखंडी पाईप आणि रॉडने या तिघींवर जीवघेणा हल्ला केला.
हा हल्ला सुरू असताना एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या व्हिडिओमध्ये आरोपी महिलांवर निर्दयीपणे हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे, ज्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.
advertisement
या हल्ल्यात दोघी महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
