काय म्हणाला महादेव गित्ते?
आम्हाला बळजबरीने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आलं, असं बापू आंधळे प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते याने खळबळजनक दावा केला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून आम्हाला गोवण्यात आलं. आमचा काहीच संबंध नव्हता. वारंवार अॅप्लिकेशन देऊन देखील काहीही मिळालं नाही. गोट्या गित्तेने माझ्या घरी येऊन हाणामारी करून आम्हाला फसवलं. बापू आंधळे हत्या प्रकरणात 307 मधून वाल्मिक कराड याला वगळण्यात आलंय. पण 120 ब मध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय, असंही महादेव गित्ते याने म्हटलं आहे.
advertisement
आमच्यावर जो अन्याय झाला, त्याला न्याय कधी मिळणार, असा जाब महादेव गित्तेच्या पत्नीने सरकारला विचारला आहे. ज्यांनी गुन्हे केले नाहीत, त्यांना जेलमध्ये ठेवलंय आणि ज्यांनी गुन्हे केलेत. त्यांना मोकार बाहेर सोडण्यात येतंय. आमची जगायची इच्छा संपलेली आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर एसपी ऑफिससमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा देखील महादेव गित्तेच्या पत्नीने दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये हा आरोप करण्यात आला आहे.
बापू आंधळे हत्या प्रकरण
दरम्यान, 29 जून 2024 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरालवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहारकर आणि राजेश वाघमोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
