तरुणी पळून जाण्याच्या तयारीत अन्...
बीडमधील वडवणी येथील एका तरुणाला लग्नासाठी मुलगी शोधत असताना या टोळीशी संपर्क साधला गेला. त्यांनी लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणाकडून 1 लाख 70 हजार रुपये घेतले. लग्नानंतर ती तरुणी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरुणीसह इतर नऊ आरोपींविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
advertisement
तीन दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे या टोळीने इतर कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
11 वाजता लग्न लावलं अन्...
लग्नास होकार मिळाल्याने आरोपी अन्य एक महिला घरी आले. त्यांनी लग्नासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 1 लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर त्याच दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता राधा आणि त्या तरुणाचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर नववधू पळून जाण्याच्या तयारीत होती.
