शोभा मुंडे यांच्यावर मध्यरात्री हल्ला
या प्रकरणी शोभा मुंडे (वय अंदाजे ४५) या महिलेचा खून झाला आहे, तर आरोपी पती तुकाराम मुंडे फरार आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
advertisement
शोभा मुंडे यांना गंभीर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम मुंडेने तीन वर्षांपूर्वीही शोभा मुंडे यांना गंभीर मारहाण केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. तरीही त्यांच्यात होणारे वाद काही थांबले नाहीत. जुन्या वादातूनच तुकारामने पुन्हा हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अवघड जागी लाथ मारली अन्...
दरम्यान, बीडमधून आणखी एक घटना समोर आली होती. एका पत्नीने पतीला अवघड जागी लाथ मारल्याने त्यात पतीचा मृत्यू झाला. 10 सप्टेंबर रोजी दारू पिऊन घरी आलेल्या कैलाससोबत मायाने नेहमीप्रमाणे वाद घातला. संतापाच्या भरात मायाने त्याला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथ मारली. नातेवाइकांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मायाने हा आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असल्याचे सांगून त्यांना हाकलून दिले.