सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसलं?
पोलिसांनी तपास केला असता अयोध्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना वृंदावनीवर संशय बळावला. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, १९ तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही. शिवाय आरोपी महिला एक मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
advertisement
पाहा Video
आयोध्या ही काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती. वृंदावणीचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. पण दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख आयोध्याशी झाली आणि त्यानंतर त्याने वृंदावणीला बाजूला करून आयोध्याशी बोलणे सुरू केले. आयोध्याचे पती चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले होते. त्यामुळे प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात होता.
दरम्यान, आरोपींनी मृतदेह लपवण्यासाठी वृंदावणीने त्याला खोक्यात भरले. मुलगा शाळेतून आल्यावर ‘कचरा टाकायचा आहे’ असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला.
