अंगावर जखमा झाल्याने मृत्यू
२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. २२ ऑक्टोबर रोजी १२:१५ ते १:३० असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते.
advertisement
सव्वा तास पोस्ट मॉर्टम
चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पोस्ट मॉर्टम चालले होते. २० महिन्यांनंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या प्रकरणातील नवनवीन धक्कादायक माहिती असे समोर येत आहे.
समोरून वार केल्याने श्वासनलिका कापली
दरम्यान, 3 डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने श्वासनलिका कापली गेली होती. शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केले होते. त्यामुळे आता महादेव मुंडे यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
